Friday, 13 September 2024

चित्र चारोळी



विषय: मी सुखरूप पोचलो हो
( चित्र चारोळी)

मुषकासह सुखरूप पोहोचता 
पार्वती माता कुशीत घेते प्रेमाने
कैलासावर पितवस्त्रात वात्सल्य 
उधळी एकमेकांवर समाधानाने

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 22 August 2024

चित्र चारोळी



महालक्ष्मी स्तोत्र वलय शोभे
सालंकृत सुहास्य वदनी माता
पंकजासनी विराजे पद्मासनी 
कलश संपत्तीचा शुभाशीर्वाद हाता 

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

Wednesday, 21 August 2024

चित्र चारोळी



मोरपीस 

निलवर्णी प्रतीबिंब उमटले
स्पर्शते निळ्याशार जलाशयात
तुषार उडती अंधारातून आनंदाने 
रंगीत डोळा उठून दिसे मोर पीसात

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

Saturday, 10 August 2024

चित्र चारोळी



विषय..‌.चित्र चारोळी

सागरतीरी खडकावरी मोहक ललना 
कंच हिरवा शालू,हाती शोभे कंकण
नजर करारी पेले नवं आव्हान 
प्रफुल्लित भासे सभोवती प्रांगण

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

Friday, 2 August 2024

चारोळी


विषय - स्वप्न साकारू

स्वप्न साकारू जागेपणी
सिद्धीस नेण्या प्रयत्न हवा
आकांक्षा मनीच्या पुर्णत्वास 
सहजी होती सत्कर्म हाच ठेवा

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

Tuesday, 30 July 2024

चारोळी


विषय:-चंद्र आहे साक्षीला 

आठवांचे बांध साचले उरी
मनीचा चंद्र आहे साक्षीला 
आकाशातील तारे चमकती
प्रकाशाने अंधार आहे प्राक्षीला

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

Thursday, 25 July 2024

चारोळी

*KAकोल्हापूर मराठी प्रतिष्ठान आयोजित उपक्रम*
*क्रमांक-९१*
*दिनांक-२६/७/२०२४*

*विषय-काहूर मनी उठले*

भावनांच्या कल्लोळातून 
काहूर मनी उठले 
गाभाऱ्यात मनाच्या ओसंडले 
विचारांच्या गर्तेत ओथंबले

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड,ता.शिरोळ, जिल्हा.कोल्हापूर