Wednesday, 22 January 2025

चित्र काव्य (सापडेल का उत्तर ?)

चित्रकाव्य
सापडेल का उत्तर?

राजा मातीचा पण कष्ट साथीला 
स्पर्श सूर्याचा हिरव्या रानात 
मुंडासे शिरी करते रक्षण
माती दाखवी रुप शुभ्र वसनात

कर गालावरी वदनी उदासी 
बाप शेतकरी बसला बांधावरी 
काय असेल मनी उद्याचीच चिंता 
भागेले का माझी यातून उसणवारी?

स्वप्न डोळ्यातील कधी होतील का पुरी? 
दिनरात कष्टाची आहे माझी 
तयारी 
बेभरवशाचा काटा टोचतोय उरी 
आशा माझ्यावरचं लावतात सारी

पेरलेलं मातीत नीट उगवेल का? 
भाव शेतमालाला मिळेल का? 
ऋण डोक्यावरचे कधी फिटेल?
शांती माझ्या मनाला कधी जाणवेल का? 

काहुर प्रश्नांचे घोळते मनात 
हरवला शेतकरी उत्तरात 
पल्लवीत आशा पाहताना पीक
स्वप्न उद्याचे दिसे वावरात

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

No comments:

Post a Comment