Tuesday, 28 January 2025

चारोळी (आसुसलेले किनारे)

         चारोळी
आसूसलेले किनारे
आयुष्याच्या संध्याकाळी निवांत 
नात्यांची वाट पाहती किनारे आसुसलेले 
भाव भरल्या आसक्त नजरांनी 
लोचने मात्र आसवांनी डबडबलेले

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Thursday, 23 January 2025

चारोळी (फुलपाखरू)

भिरभिरणारे फुलपाखरू 
स्थिरावले अवचित बोटावरती 
भास्कर किरणे स्पर्शिती अंगा
पसरले चहू दिशा झाडावरती 

रंगबिरंगी रूप पाहता 
नाजूक कोमल पंखावरती 
मोहरले मन दृश्य पाहता 
स्पर्शूनी पहावे अंगावरती 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी (वेड शब्दांचे )


विषय:- वेड शब्दांचे

वेड शब्दांचे सारस्वतांना 
भावभावनांच्या प्रकटीकरणाला 
शब्दा शब्दांचा हार विचारांचा 
सज्ज होऊया जन जागरणाला 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Wednesday, 22 January 2025

चित्र काव्य (सापडेल का उत्तर ?)

चित्रकाव्य
सापडेल का उत्तर?

राजा मातीचा पण कष्ट साथीला 
स्पर्श सूर्याचा हिरव्या रानात 
मुंडासे शिरी करते रक्षण
माती दाखवी रुप शुभ्र वसनात

कर गालावरी वदनी उदासी 
बाप शेतकरी बसला बांधावरी 
काय असेल मनी उद्याचीच चिंता 
भागेले का माझी यातून उसणवारी?

स्वप्न डोळ्यातील कधी होतील का पुरी? 
दिनरात कष्टाची आहे माझी 
तयारी 
बेभरवशाचा काटा टोचतोय उरी 
आशा माझ्यावरचं लावतात सारी

पेरलेलं मातीत नीट उगवेल का? 
भाव शेतमालाला मिळेल का? 
ऋण डोक्यावरचे कधी फिटेल?
शांती माझ्या मनाला कधी जाणवेल का? 

काहुर प्रश्नांचे घोळते मनात 
हरवला शेतकरी उत्तरात 
पल्लवीत आशा पाहताना पीक
स्वप्न उद्याचे दिसे वावरात

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Tuesday, 21 January 2025

चारोळी (हृदयी जागा तू अनुरागा)



विषय- हृदयी  जागा तू अनुरागा

चारोळी

हृदयी जागा तू अनुरागा 
जोडून बंधना जागवी प्रीत 
नकळत फुलते मनात रुजते 
हीच आहे अनोखी रीत 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Sunday, 19 January 2025

चारोळी (ही वाट दूर जाते)

- ही वाट दूर जाते 

सुखदुःखाची नागमोडी वळणे घेत 
आयुष्याची ही वाट दूर जाते 
भावभावनांचा होतो जेंव्हा निचरा 
मन माझे तेव्हा सुखी होते 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर