Tuesday, 30 July 2024

चारोळी


विषय:-चंद्र आहे साक्षीला 

आठवांचे बांध साचले उरी
मनीचा चंद्र आहे साक्षीला 
आकाशातील तारे चमकती
प्रकाशाने अंधार आहे प्राक्षीला

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

Thursday, 25 July 2024

चारोळी

*KAकोल्हापूर मराठी प्रतिष्ठान आयोजित उपक्रम*
*क्रमांक-९१*
*दिनांक-२६/७/२०२४*

*विषय-काहूर मनी उठले*

भावनांच्या कल्लोळातून 
काहूर मनी उठले 
गाभाऱ्यात मनाच्या ओसंडले 
विचारांच्या गर्तेत ओथंबले

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड,ता.शिरोळ, जिल्हा.कोल्हापूर

Monday, 22 July 2024

चित्र चारोळी

कोल्हापूर साहित्य मंच आयोजित 
उपक्रम -  २६२
विषय-  चित्र चारोळी
 दिनांक 22 /7/ 24

उब मायेची वात्सल्याची बाळा
कुशीत मातेच्या बाल्य निवांत 
निरागसता दिसे बालकाच्या ओठी
सागर मातृत्वाचा असे प्रशांत

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर.

Tuesday, 16 July 2024

चारोळी

*माझी लेखणी साहित्य मंच शहापुर जिल्हा ठाणे अंतर्गत*

*संत विचार चारोळी साहित्य मंच आयोजित चारोळी लेखन स्पर्धा* 

*दि. १७ जुलै २०२४* 

विषय... क्रमांक १) 
चंद्रभागा

शिर्षक - विठ्ठल 

गजर विठ्ठलाचा सर्वदूर 
चंद्रभागेच्या तीरी ऐकू येतो
भक्त तल्लीन वाळवंटी नाचे
भक्ती रंगात रंगून असा जातो

 विषय... क्रमांक २)
दुमदुमली पंढरी
शिर्षक - माऊली 

नामघोषात माऊलींच्या 
दुमदुमली पंढरी भक्तीभावे
वारकरी विसरला भवसागर 
मनी ध्यास विठ्ठल दर्शन व्हावे 

विषय... क्रमांक ३)
भेटला विठ्ठल माझा
शिर्षक - जगजेठी

आषाढी एकादशी दिन शुभ
जगजेठी उभा कर कटेवर
लल्लाटी टिळा, सुंदर ध्यान
भक्त आसुसला दर्शना वाटेवर

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
ता.शिरोळ, जिल्हा.कोल्हापूर
९८८१८६२५३०

Monday, 15 July 2024

चित्र चारोळी

माझी लेखणी साहित्य समूह अंतर्गत संत विचार चालू आहे साहित्य मंच आयोजित
उपक्रम क्रमांक 31
विषय  : चित्र चारोळी
दिनांक २६/०७/२०२४

शिर्षक - माऊली 

माऊलींच्या दर्शना माऊली खांद्यावरी
भाव भक्तीचा नजारा आगळा
समाधान वदनी सुख त्रैलोक्याचे
ध्यास वारीचा अंतरानंद वेगळा

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर
९८८१८६२५३०

Sunday, 7 July 2024

माहेर

अष्टाक्षरी
विषय- माहेर

असे सुरेख माहेर
मना फार सुखावते
आठवण हर घडी
लोचनात ओलावते

आईबाबा पांघरूण 
दु:खावर पांघरती 
सुख पदरी घालती
माया नेहमी करती

माहेरची नातीगोती 
घट्ट मिठी ‌स्नेहधागा
साठवण आयुष्यात 
जशी शोभे चंद्रभागा 

बंधू माझा पाठीराखा 
लाज राखीची राखतो
निरांजने लोचनांची
सदा तेवत ठेवतो

माया सागर प्रेमाचा
नाही आटत कधीही 
वाहे मनात सर्वांच्या
व्यथा खूपल्या तरीही 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड,ता.शिरोळ
जिल्हा.कोल्हापूर
९८८१८६२५३०

Friday, 5 July 2024

चारोळी

*चित्र चारोळी लेखन*

तंबोरा,चिपळ्या वाजती सुंदर 
छोटा वारकरी वेष अंगा भारी
सानिध्य निसर्गाचे सभोवती
हास्य मुखी,भाळी नाम,मुंडासे शिरी

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
त्या.शिरोळ, जिल्हा.कोल्हापूर